Chandrayaan-3 – भारताने 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरवून इतिहास रचला होता. यानंतर जगभारत भारताचे कौतुक झाले. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर चांद्रयान-3 ने आपल्या मोहिमेला सुरुवात केली. आता याच दरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे.
चांद्रयान-3 च्या विक्रम लॅंडर मॉड्यूलने चंद्रावर 2.06 टन चंद्र एपिरेगोलिथ म्हणजेच चंद्राची धूळ उडवली आहे. यामुळे अंतराळातून दिसणारे एक मोठे छिद्र निर्माण झाले. चांद्रयान-3च्या प्रक्षेपणाच्या वेळी निरीक्षक चांद्रयान-2 मोहिमेवर लक्ष ठेवून होते.
चांद्रयान-2च्या कॅमेऱ्यांनी चंद्राच्या कक्षेत चांद्रयान-3च्या विक्रम लॅंडरच्या लॅंडिंग साइटची छायाचित्रे घेतली होती. चांद्रयान-2 ऑर्बिटर प्रतिमांमध्ये एक मोठा ढीग दिसतो, की जो चंद्राच्या धुळीचा आहे.
चांद्रयान-3च्या लॅंडरने चंद्राच्या पृष्ठभागास जेव्हा स्पर्श केला आणि विक्रम लॅंडरने चंद्राची धूळ उडवली. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, लॅंडिंगमुळे सुमारे 2.06 मेट्रिक टन (4,500 पौंड) चंद्राची धूळ आली आणि ती 1,167 चौरस फूट (108.4 चौरस मीटर) क्षेत्रफळावर पसरली.
भारतीय अंतराळ संस्था इस्रोने म्हटले आहे की चांद्रयान-3 मिशनचे विक्रम लॅंडर 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले. थ्रस्टर्सची क्रिया आणि त्याच्या प्रभावामुळे लॅंडिंगच्या वेळी चंद्राच्या पृष्ठभागावरून एपिरेगोलिथ सामग्री बाहेर पडली.
यामुळे इजेक्टा प्रभामंडल तयार झाला. इस्रोचे म्हणणे आहे की, आम्ही चांद्रयान-2 ऑर्बिटरच्या ऑर्बिटर हाय रिझोल्यूशन कॅमेऱ्यातून उतरण्यापूर्वी आणि नंतरच्या उच्च रिझोल्यूशनच्या पंचक्रोमॅटिक प्रतिमांची तुलना केली त्यातून ही माहिती समोर आली.