तेल अविव – इस्रायलच्या सैन्यामधील भारतीय वंशाच्या एका सैनिकाचा गाझामध्ये लढताना मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या 17 सैनिक आज युद्दादरम्यान मारले गेले. त्यामध्ये या भारतीय वंशाच्या सैनिकाचा समावेश होता. स्टाफ सार्जंट हालेल सोलोमोन असे या 20 वर्षीय सैनिकाचे नाव आहे, असे मेजर बेनी बिटन यांनी फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सार्जंट हालेल हे डायमोना येथीलरहिवासी होते. ते गिवाटी ब्रिगेडमधील सैनिक होते. त्यांना त्यांच्या पालकांबद्दल नितांत आदर होता. ते नम्र आणि मानवतावादी विचारांनी बारलेले होते, असे मेजर बिटन यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
इस्रायलच्या फौजांनी गाझामध्ये खूप आत जाऊन लष्करी कारवाईला सुरुवात केली आहे. या संघषा4दरम्यान हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या तिखट प्रतिकारादरम्यान इस्रायलच्या 17 सैनिकांचा मृत्यू झाला. इस्रायलच्या सैन्याला मोठे .यश मिळत आहे मात्र यासाठी इस्रायलच्या सैन्यदलाचे वेदनादायी नुकसान झाल्याचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे.