बेल्हे -चाळकडी (ता. जुन्नर) येथील सोनवणे मळ्यात राहणाऱ्या प्रताप सोनवणे यांच्या गोठ्यात बुधवारी (दि. 11) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून अंदाजे 1 वर्षे वयाच्या कालवडीचा जागीच फडशा पाडला.
सोनवणे यांच्या गोठ्यात बांधलेल्या कालवडीशेजारी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कालवड जागीच ठार केली. जवळच उसाचे क्षेत्र असल्यामुळे बिबट्याला मोठ्या प्रमाणात लपण तयार झालेली आहे.