मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून रियाची चौकशी सुरू असतानाच ड्रग्जच्या अँगलबाबत आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली.
या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोण, दिया मिर्झा श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत कौर, नम्रता शिरोडकर असे अनेक अभिनेत्रींचे नाव समोर आले आहेत. याबाबत संजय राऊत यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना मिश्कील टोला लगावाला.
संजय राऊत वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले कि,’ड्रग्ज प्रकरणात आता केवळ डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव येणं बाकी आहे. ड्रग्ज ही केवळ आपली समस्या नाही. ही देशभराची आणि जगाची समस्या आहे. पंजाबमध्येही मोठ्या प्रमाणात ड्रग्जची समस्या होती ,” असं राऊत म्हणाले. ड्रग्ज कनेक्शन केवळ चित्रपटसृष्टीपुरतं मर्यादित नाही. त्याची संपूर्ण देशात चौकशी होणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.