येरवडा- कामगार वसाहतीमध्ये ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरासमोर आले असून, मागील चार दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे. पालिकेचे क्षेत्रीय अधिकारी, कमर्चारी, नगरसेवक यांना ही घटना सांगून देखील कोणत्याही प्रकारची उपाययोजना या ठिकाणी केली गेली नाही. दरम्यान, आता नागरिकांनाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करूनही हे चेंबर्सची दुरुस्ती झाली नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कामगार वसाहतीमधील ड्रेनेजच्या लाईन जुन्या झाल्या असल्याने येथील रस्त्याचे कामही थांबविले आहे. वर्षानुवर्षे येथील नागरिक ड्रेनेजच्या लाईन तुबंत असून नगरसेवकांना वेळोवेळी सांगूनही नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे येथील रहिवाशी नितीन हिंगे यांनी सांगितले.
या ड्रेनेजच्या लाईन लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावी ड्रेनेजच्या पाण्याच्या घाण वासामुळे आमची मुले आजारी पडू लागली आहेत. असे संपदा डावरे यांनी सांगितले आहे.