Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सध्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे काही उमेदवार निवडणुकीतही पुढे येत आहेत, ज्यांची संपत्ती करोडोंमध्ये नाही तर अब्जावधीत आहे.
आतापर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल केलेल्या सर्व उमेदवारांमध्ये तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर हे सर्वात श्रीमंत आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ५,७८५ कोटी रुपये आहे. म्हणजेच या निवडणुकीत ते आतापर्यंतचे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.
चंद्रशेखर हे एनआरआय डॉक्टर आहे. टीडीपीने त्यांना गुंटूरमधून उमेदवार केले आहे. चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी आंध्र प्रदेशातील सर्व लोकसभा जागांवर मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकाही होत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठीही 13 मे रोजी मतदान होणार आहे. गुंटूर लोकसभा जागेवर टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस पक्ष यांच्यात लढत आहे. चंद्रशेखर यांच्या विरोधात वायएसआरसीपीचे व्यंकट रोसैया रिंगणात आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत टीडीपीचे गल्ला जयदेव येथून खासदार झाले. तसेच भाजपचे कोंडा विश्वेश्वर हे श्रीमंत उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तेलंगणातील चेवेल्ला मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या विश्वेश्वर यांची एकूण संपत्ती 4,568 कोटी रुपये आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार, दुसऱ्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या 1192 उमेदवारांपैकी 390 कोट्यधीश आहेत. म्हणजे एकूण 33 टक्के. त्याचवेळी निवडणूक लढविणाऱ्या 6 उमेदवारांनी आपली संपत्ती शून्य असल्याचे जाहीर केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील 140 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती 5 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक आहे.