सातारा -राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 132 व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी सातारा जिल्ह्यात अभिवादन करण्यात आले. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. साताऱ्यात शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर सकाळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भीमज्योतींचे शाहू चौकात महामानवाच्या पुतळ्याजवळ उत्साहात स्वागत करण्यात आले.
साताऱ्यात शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मध्यरात्री 12 वाजता खा. उदयनराजे भोसले आणि रिपाइंच्या नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात जन्माला आलो असतो, तर मलाही त्यांचा सहवास लाभला असता. डॉ. आंबेडकरांचे विचार कृतीत आणणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत उदयनराजेंनी व्यक्त केले. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावतीने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या पुतळ्यावर सकाळी 11.30 वाजता हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. “विश्वरत्न, महामानवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’ अशा घोषणांनी शाहू चौक परिसर दणाणून गेला होत.