मुंबई – भांडण, प्रेम, द्वेष आणि स्पर्धा या सगळ्यांचं मिश्रण असलेला सर्वांचा लाडका रिएलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजन करीत आहे. अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बिग बॉस 14’ या रिअॅलिटी शो ची नुकतीच सुरुवात झाली आहे.
सध्या बिग बॉसच्या घरातील प्रबळ दावेदार म्हणून पवित्राकडे पाहिलं जातं. पवित्रा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पवित्रा सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याच वेळा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
View this post on Instagram
यातच सोशल मीडियावर पवित्राचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या लव्हलाइफविषयी काही गोष्टींचा खुलासा केल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये पवित्रा एकाच वेळी दोन मुलांना डेट करत असल्याचं मान्य करताना दिसत आहे.
त्यामुळे भांडण, प्रेम, द्वेष आणि स्पर्धा या सगळ्यांचं मिश्रण असलेला सर्वांचा लाडका रिएलिटी शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.