बारामती : बारामती शहर व तालुक्यात आज 18 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. बारामतीत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २१० वर पोहोचली आहे.
दिनांक (5ऑगस्ट ) रोजी प्रतीक्षेत असलेल्या २१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती तालुक्यातील 18जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये बारामती शहरातील 14 व ग्रामीण भागातील 4 रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये डोरलेवाडी 1, बर्हाणपूर 1, वंजारवाडी 1 व गुणवडी येथील 2 जणांचा समावेश आहे.
बारामती शहरांमधील प्रगती नगरतील 2, महादेव मळा 2, तांदूळवाडी 1, रुई 4, आमराई 1, कृषी देवता नगर येथील रुग्णाच्या संपर्कातील 1, खंडोबा नगरमधील 1, हरिकृपा नगर 1 व शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे.