Bollywood: ज्येष्ठ लेखक-गीतकार जावेद अख्तर यांनी नुकताच त्यांचा 79 व्या वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे अभिनेता अनिल कपूरने त्याच्या घरी वाढदिवसाची भव्य पार्टी आयोजित केली होती. अनेक दिग्गज बॉलीवूड स्टार्सनी या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये जावेद अख्तर पापाराझींवर भडकल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पापाराझींनी व्हिडिओ, फोटोसाठी अनिल यांच्या घराबाहेर केलेल्या गोंधळामुळे जावेद खूश दिसत नव्हते. जेव्हा ते पत्नी शबाना आझमीसोबत पोज देण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा अनेक छायाचित्रकार त्यांचे नाव घेत होते, तेव्हा जावेद अख्तर यांनी त्यांना आवाज न करण्यास सांगितले. यावेळी ते पापाराझींवर संतापल्याचे पाहायला मिळाले.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये दिसते की, जावेद अख्तर शबाना आझमीचा हात धरून कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. फोटोसाठी पापाराझींनी केलेल्या गोंधळामुळे ते ‘आवाज करू नका’ असे म्हणताना दिसत आहेत. मात्र त्यानंतर ते कॅमेऱ्यासमोर पोज देतात आणि आभारही मानतात. यावेळी जावेद पारंपारिक कुर्ता आणि जॅकेट परिधान करून पार्टीत सहभागी झाले होते. मात्र जावेद यांच्या या वागण्यामुळे नेटकरी त्यांना जया बच्चन यांचा भाऊ म्हणत त्यांना ट्रोल करत आहे. ‘जया बच्चन यांचा भाऊ, ज्यांना आवाजचा तिरस्कार आहे.’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
दरम्यान, अनिल कपूरने दिलेल्या या वाढदिवसाच्या पार्टीला माधुरी दीक्षितने पती श्रीराम नेनेसोबत हजेरी लावली होती. अभिनेता फरहान अख्तर त्याची पत्नी शिबानी दांडेकरसोबत पोहोचला होता. तर सोनम कपूरनेही पती आनंद आहुजाबरोबर हजेरी लावली होती.