Ayodhya Ram Mandir : देशासाठी ऐतिहासिक मानला जाणारा राम मंदिर लोकार्पण सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. या निमित्ताने अयोध्यासह देशभरात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. राम मंदिरात काल म्हणजेच १८ जानेवारीला गाभाऱ्यात मूर्ती ठेवण्यात आली. दरम्यान, या मंदिरातला मूर्तीचा पहिला फोटो आता समोर आला आहे.
प्रभू श्रीरामांची मूर्ती कशी असणार हे जाणून घेण्याची सर्वांची इच्छा आहे. दरम्यान ही इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. राम मंदिरात रामलल्ला म्हणजेच बाळ रुपातील राम मंदिरात स्थापित करण्यात येणार आहे. याशिवाय अरुण योगीराज यांनी शाळीग्राम दगडापासून घडवलेली रामाची मूर्तीही असणार आहे. अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती गाभाऱ्यात ठेवण्यात आली आहे. याच मूर्तीचा पहिला फोटो समोर आला आहे. सोशल मीडियावर या फोटोची सध्या चर्चा होताना दिसून येत आहे.
Take a look at idol of Lord Ram inside Ayodhya temple’s sanctum sanctorum
Read @ANI Story | https://t.co/MSbha3ACQA#RamMandirPranPratishta #RamLalla #ayodhya pic.twitter.com/19PhJehGef
— ANI Digital (@ani_digital) January 18, 2024
राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आल्यानंतर या मूर्तीचा फोटो समोर आला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या कामात गुंतलेले सर्व कामगार मूर्ती ठेवण्यात आल्यानंतर हात जोडून प्रार्थना करत असल्याचे फोटोच्या माध्यमातून दिसून येत आहेत.
राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाला त्यांच्या आसनावर बसवण्यात आले आहे. आता फक्त प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम उरला असून 22 जानेवारी रोजी, देशातील प्रत्येकजण रामललाचा अभिषेक सर्वांनाच पाहता येणार आहे.
कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही मूर्ती तयार केली आहे. मैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार आहेत. अरुण योगीराज यांनी यापूर्वी अनेक रेखीव मूर्ती आणि शिल्पं साकारली आहेत. अरुण यांच्या कामाचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलेले आहे.