दौंड -दौंड तालुक्यामध्ये सध्या करोनाने धुमाकूळ घातला आहे. तालुक्यात सातत्याने रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी (दि. 30) एका दिवसात तालुक्यातील विविध भागात आठ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे व वैद्यकीय अधिकारी अशोक रासगे यांनी दिली.
दौंड शहरातील 46 संशयित नागरिकांची करोनाची तपासणी करण्यात आली होती. त्यातील सहाजणांचे वैद्यकीय अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वावर दौंड येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे.
ग्रामीण भागातील मलठण व वरवंड येथील प्रत्येकी एकजणाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.