पिंपरी – लॉकडाऊन शिथिल करत जीवनमान पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊन शिथिल झाला असला. तरी, करोना आपल्यातून गेला नाही. लस व योग्य औषध मिळत नाही. तोपर्यंत करोना आपल्या सोबत राहणार आहे. लॉकडाऊन शिथिल होताच शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, व करोनाला आमंत्रण देऊ नये, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
आयुक्त हर्डीकर यांनी महापालिकेच्या फेसबुक पेजवर व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात आयुक्त हर्डीकर सांगतात, पिंपरी-चिंचवडकर नागरिकांनी या करोना विषाणूविरोधातील लढ्याला आत्तापर्यंत चांगले सहकार्य केले आहे. यापुढेही योग्य काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.