जेजुरी -महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंगावर सूर्यग्रहणाच्या काळात मंत्रपठण करीत जलाभिषेक करण्यात आला. हा धार्मिक विधी तीन तासांहून अधिक काळ सुरू होता.
करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी साडेतीन महिन्यापासून भाविकांना देवदर्शन बंद आहे. मात्र, पुजारी -सेवेकरीवर्गाकडून “श्रीं’चे नित्याचे धार्मिक विधी सुरू आहेत. ग्रहण काळात खंडोबा मंदिरात होमहवन, जलाभिषेक, वेदमंत्र पठण लघुरुद्र आदी धार्मिक विधींना मोठे महत्व आहे.
परंपरेनुसार रविवारी (दि.21) ग्रहणाचे स्पर्श, मध्य, मोक्ष वेळेत म्हणजेच सकाळी 10 तर दुपारी 1;30 वाजेपर्यंत स्वयंभू लिंगावर जलाभिषेक 121 आवर्तन (लघुरुद्र) वेदमंत्र पठण करण्यात आले. यावेळी वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, पुजारी चेतन सातभाई, हनुमंत लांघी, मुन्ना बारभाई, अमित खाडे आदी उपस्थित होते.