मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांच्या उपस्थितीत आज (दि. २७) मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या रंगशारदा सभागृहात ही बैठक पार पडली.
‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ मनसेने येत्या ९ फेब्रुवारीला आझाद मैदानात आयोजित केलेल्या मोर्चाची दिशा यावेळी ठरवली. तसेच राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या. ‘मला हिंदू हृदयसम्राट संबोधू नका’ असे सुद्धा राज यावेळी म्हणाले. दरम्यान, अवघ्या १० मिनिटात बैठक संपून राज ठाकरे आपल्या निवास्थानी रवाना झाले.
नुकतंच मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. पूर्णपणे भगव्या रंगाच्या या ध्वजावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता, शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते” हे शब्द या राजमुद्रेवर आहेत.