…तर आम्ही पाठिंबा देऊ – देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद – मराठवाड्याचे पाणी आताचे सरकार पळवेळ अशी भीती वाटते. तुम्हाला काय श्रेय हवे आहे ते घ्या. पण आमच्या मराठवाड्याचे पाणी हिसकवून घेऊ नका आणि योजना बंद करू नका, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी भाजपच्या माजी नेत्या पंकजा मुंडे आज लाक्षणिक उपोषण करत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, आम्ही मराठवाड्यासाठी अनेक योजना आखल्या आहे. आताच्या सरकारला त्याचं क्रेडिट हवं असेल, तुम्हाला योजनांचं नाव बदलायचं असेल तर बदला पण योजना बंद करू नका. तसेच मराठवाड्याच्या पाण्याची काम पुढे नेली तर आम्ही तुम्हाला याबाबतीत पाठिंबा देऊ, असेही फडणवीसांनी म्हंटले आहे. मुंडे साहेबांच्या नेतृत्तावमध्ये मराठवड्याचं पाणी परत मिळालं पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, आमचे उपोषण मराठवाड्याच्या पाण्याकरता आहे. आम्हाला मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा आहे. त्यासाठी आम्ही अनेक योजनांवर काम करत आहोत. आमच्या योजना पुढे नेल्या नाहीतर मोठी लढाई उभारली जाईल, असा इशाराही फडणवीसांनी राज्य सरकारला दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here