रांजणगाव गणपती (वार्ताहर) – पिंपरी दुमाला गावच्या दबंग सरपंच मनीषा खेडकर यांनी आज अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या इसमास चोप दिल्याने व संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
पिंपरी दुमाला परिसरामध्ये सदर इसम हा गावातील काही लोकांच्या राजकीय वरदहस्तामुळे गेल्या अनेक दिवसापासून दारूविक्री करत होता. मात्र या दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले होते ही बाब मनीषाताई खेडकर यांना खटकत होती. या बाबत पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सांगितले जायचे मात्र, पोलीस लुटुपुटुची कारवाई करुन निघून जायचे व पून्हा दारु धंदा जोमात सुरु व्हायचा.
त्यामुळे या दारु विक्रेत्यास धडा शिकवायचा या जिद्दीने मनिषाताई खेडकर यांनी तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन शेळके पोलीस पाटील संतोष जाधव यांच्या उपस्थितीमध्ये या दारू विक्रेत्यास चांगलाच धडा शिकवला. गेला घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे व मनीषा त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.
तरी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी व लोकप्रतिनिधींनी या अवैध व्यवसाय वरती आळा घालावा अशी मागणी मनिषाताई खेडकर व ग्रामस्थांनी केली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमातून फिरु लागताच रांजणगाव पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मुद्देमाल जप्त केला.