Viral Photo: सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा सोशल मीडियावर स्क्रोल करताना असे काही फोटो येतात की ते ओळखणे आपल्याला कठीण जाते. तसेच काही फोटो अपलोड करून त्याबाबत माहिती विचारली जाते. काही कोडेही टाकले जातात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावार व्हायरल होत असून तो फोटो कशाचा आहे आणि त्या फळाला तुमच्या भागात कोणत्या नावाने ओळखले जाते असे विचारण्यात आले आहे.
सोनाली शुक्ला या ट्विटर अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून खुप कमी लोक या फळाशी परिचित असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान, हे फळ चिंचेसारखे दिसत आहे. काही जण याला फिरंगी चिंच असल्याचे सांगत आहे. एका झाडाला हे फळ लटकलेलं दिसत आहे. याला काही भागात जलेबी म्हणून ओळखले जाते.
कम ही लोग बता पाएंगे इस फल के बारे में pic.twitter.com/eWvALP4vMJ
— Sonali Shukla (@Sonali_S2) February 23, 2023
दरम्यान, या चिंचेला हिंदीमध्ये जंगल जलेबी म्हणतात तर मराठीत इंग्रजी चिंच किंवा फिरंगी चिंच म्हणतात. तुमच्या भागात या फळाला काय म्हणून ओळखले जाते हे आम्हाला कमेंट करून सांगा. अनेकांना ही चिंच पाहून बालपणाची आठवण होत असल्याचे कमेंटमध्ये सांगण्यात आले आहे. या चिंचेचे झाड अनेकदा नदीच्या काठावार उगवलेले पाहायला मिळते. या झाडाला काटेही असतात त्यामुळे झाडावर चढणे शक्य होत नाही त्यामुळे लोक आकडा करून या चिंचा काढतात. उन्हाळ्यात लहान मुले हातात काठ्यांचे आकडे घेऊन चिंचा काढायला फिरत असल्याचेही दिसत असते.