पुणे – अनंत चतुदर्शी गुरूवारी (दि. 28) आहे. दरवर्षीप्रमाणे अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. 29) मार्केट यार्डातील (market yard) फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग, फुल बाजार, खडकी, मोशी आणि मांजरी उपबाजार बंद राहणार आहे.
तर शनिवारी (दि.30) साप्ताहिक सुट्टीमुळे फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर,
सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी केले आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजेपासून शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत परिसरतीाल पेट्रोल पंपही बंद राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.