नवी दिल्ली – तामीळनाडूतील सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या द्रमुकने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षांबरोबरचे जागावाटप पूर्ण केले. त्या राज्यातील एकूण ३९ पैकी २१ जागा स्वत: द्रमुक लढवणार आहे.
द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीत कॉंग्रेस, माकप, भाकप, व्हीसीके, एमडीएमके, केएमडीके आणि आययूएमएल या पक्षांचा समावेश आहे. द्रमुकने मित्रपक्षांसाठी १८ जागा सोडल्या आहेत. कॉंग्रेसच्या वाट्याला ९ जागा आल्या आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत (वर्ष २०१९) द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने तब्बल ३८ जागा जिंकत एकहाती वर्चस्व मिळवले.
यावेळी त्या आघाडीत ज्येष्ठ अभिनेते कलम हासन यांच्या नेतृत्वाखालील मक्कल निधी मय्यम (एमएनएम) हा पक्षही सहभागी झाला आहे. मात्र, तो पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नाही. त्या पक्षाला राज्यसभा निवडणुकीत एक जागा दिली जाणार आहे. ती राज्यसभा निवडणूक पुढील वर्षी होईल. तूर्त, हसन यांच्या रूपाने तामीळनाडूतील सत्तारूढ आघाडीला एक स्टार प्रचारक मिळणार आहे. त्या आघाडीने पुदुचेरीतील लोकसभेची एकमेव जागा कॉंग्रेसला दिली आहे. चेन्नई, दि. १० – तामीळनाडूतील सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या द्रमुकने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षांबरोबरचे जागावाटप पूर्ण केले. त्या राज्यातील एकूण ३९ पैकी २१ जागा स्वत: द्रमुक लढवणार आहे.
द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीत कॉंग्रेस, माकप, भाकप, व्हीसीके, एमडीएमके, केएमडीके आणि आययूएमएल या पक्षांचा समावेश आहे. द्रमुकने मित्रपक्षांसाठी १८ जागा सोडल्या आहेत. कॉंग्रेसच्या वाट्याला ९ जागा आल्या आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत (वर्ष २०१९) द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने तब्बल ३८ जागा जिंकत एकहाती वर्चस्व मिळवले.
यावेळी त्या आघाडीत ज्येष्ठ अभिनेते कलम हासन यांच्या नेतृत्वाखालील मक्कल निधी मय्यम (एमएनएम) हा पक्षही सहभागी झाला आहे. मात्र, तो पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नाही. त्या पक्षाला राज्यसभा निवडणुकीत एक जागा दिली जाणार आहे. ती राज्यसभा निवडणूक पुढील वर्षी होईल. तूर्त, हासन यांच्या रूपाने तामीळनाडूतील सत्तारूढ आघाडीला एक स्टार प्रचारक मिळणार आहे. त्या आघाडीने पुदुचेरीतील लोकसभेची एकमेव जागा कॉंग्रेसला दिली आहे.