बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षयकुमार हा इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त कलाकारांपैकी एक आहे. अगदी करोनाव्हायरसच्या काळातील अक्षयकुमार आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. अक्षयकुमारचा “लक्ष्मी’ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
“लक्ष्मी’ रिलीज झाल्यानंतर अक्षयकुमारने त्याच्या आगामी प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे.
अक्षयकुमार सध्या त्याच्या “अतरंगी रे’चे चित्रीकरण करत आहे. यात अक्षयसोबत सारा अली खान आणि दक्षिण सुपरस्टार धनुष झळकणार आहेत. अक्षयकुमारचा हा चित्रपट सन 2021 मध्ये प्रदर्शित होईल. “अतरंगी रे’शिवाय अक्षयकुमार हा “सूर्यवंशी’ आणि “राम सेतू’मध्ये काम करणार आहे.
अक्षय कुमारने दिवाळीच्या प्रसंगी “राम सेतू’ची अधिकृत घोषणा केली होती आणि आता त्याने चित्रपटाची रिलीज डेट निश्चित केली आहे. अभिनेत्याने “राम सेतू’च्या प्रदर्शनासाठी 2022ची दिवाळी बुक केली आहे. हा चित्रपट दिवाळी-2020च्या वीकेंडचा प्रदर्शित करण्यात येईल.
दरम्यान, चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू करण्यात येणार आहे.
रामावर आधारित असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग अयोध्या येथे करण्यात येणार आहे. यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच परवानगी दिली आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास वर्षे 2021मध्ये अक्षयकुमारचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या यादीत “सूर्यवंशी’, “अतरंगी रे’, “बेल बॉटम’, “बच्चन पांडे’, “रक्षाबंधन’ यासारख्या चित्रपटांची नावे आहेत.