सांगवी – करोना महामारीने अनेकांचे बळी घेतले आहेत. परंतु हिंजवडीतील 105 वर्षांच्या आजीबाईंनी प्रबळ इच्छाशक्ती आणि सुयोग्य उपचाराच्या जोरावर करोनावर मात केली आहे. शांताबाई हुलावळे असे या आजीबाईंचे नाव आहे.
वाकड व हिंजवडी येथील डॉ. किरण मुळे यांच्या गोल्डन केअर हॉस्पिटलमध्ये करोनावरील उपचारासाठी आजीबाईंना दाखल करण्यात आले. आजीबाईंची प्रबळ इच्छाशक्ती आणि डॉ. किरण मुळे आणि डॉ. रोहित कणसे यांनी केलेल्या सुनियोजित उपचारांमुळे अगदी काही दिवसांतच करोना या महाभयंकर आजारावर आजीबाईंनी यशस्वी मात करून आजीबाई बऱ्या होऊन घरी परतल्या.
हुलावळे कुटुंबीयांकडून आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून आजीबाईंना सतत धीर दिला जात होता आणि याच गोष्टीची करोनाबाधितांना खरी गरज आहे.
आजी ठणठणीत बरी होऊन आल्याने हिंजवडी परिसरात व कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण आहे. तसेच आजीबाईंच्या प्रतिकारशक्तीची चर्चा होत आहे.