चिंबळी -कुरूळी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापिका शोभा सुतार यांनी दिली.
या वर्षाचे शैक्षणिक पर्व सोमवारी (दि. 15) पासून सुरू झाले आहे; परंतु करोना साथीच्या वाढत्या प्रसारामुळे सर्व शाळा बंद आहेत; पण विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून त्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष चद्रंकात सोनवणे, माजी सरपंच एम. के. सोनवणे, मल्हारी बागडे, संतोष घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शोभा सुतार म्हणाल्या की, होईल तेवढे ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शक्य होईल तेवढा अभ्यास घरी करावा. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत काही शंका, अडचणी आल्यास व्हॉट्स-ऍप किंवा इतर माध्यमांतून संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी ग्ररामपंचायतीच्या वतीने सॅनिटायझर व सॅन्ड शाळेसाठी देण्यात आले.