इंदोरीकर महाराजांतर्फे गरिबांना धान्य वाटप 

अहमदनगर : कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गरीब कुटुंबासाठी प्रसिद्ध कीतर्नकार इंदोरीकर महाराज देशमुख यांनी मदत केली आहे. त्यांनी  संगमनेर तालुक्यातील  कोकणगाव, वडगापान  ओझर, रहिमपूर, येथील काही गरीब कुटुंबाना धान्याचे वाटप केले आहे.
तसेच संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्याकडे १ लाखाचा धनादेश सुपूर्त केला आहे.
यावेळी यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे, रहिमपुर सरपंच बाजीराव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गाढे, उपसरपंच रामदास शिंदे, पत्रकार स्वानंद चत्तर, राजेंद्र गाढे आदी  उपस्थित होते.
यापूर्वी इंदोरीकर महाराज यांनी नागरिकांना घरातून बाहेर ना पडण्याचे आवाहन केले होते. मीही घरातच राहतो तुम्हीही घरीच राहा; सुरक्षित राहा असे ते म्हणाले होते. दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून, कोरोनाचे नवे ४७ रुग्ण आढळले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.