पुणे – अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेमधील रेशनकार्डधारकांना बुधवारपासून (दि.1) स्वस्त धान्य दुकानांमधून तीन महिन्यांचे धान्य मिळणार आहे. लॉकडाऊन परिस्थितीमुळे धान्य घेण्याकरिता लाभार्थ्यांची गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब विचारात घेता धान्य दुकानदारांनी नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले.
दरम्यान, आज (दि.1) पर्वती गांव येथे रेशनकार्डधारकांना तीन महिन्याचे रेशन देण्यात आले. यावेळी नागरिकांना सोशल डिस्टन्स ठेवूनच धान्याचे वाटप करण्यात आले.
नागरिकांना दर महिन्याला रेशनदुकानात जावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरजुंना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.