करण जोहरने 2012 मध्ये आलिया भटला “स्टुडंट ऑफ द इयर’मधून बॉलिवूडमध्ये लॉंच केले. त्यानंतर आलियाने बॉलिवूडमध्ये खूप चांगले रोल केले. तिच्यातील अभिनय कौशल्याला बॉलिवूडने मान्यता दिली आहे. पण अजूनही तिच्यातल्या चांगल्या अभिनेत्रीला साजेसा रोल तिला दिला गेलेला नाही. ही खंत स्वतः करण जोहरनेच बोलून दाखवली आहे.
आलियाच्या आगामी “तख्त’चे डायरेक्शन स्वतः करण जोहर करणार आहे. मात्र आलियाच्या अभिनय कौशल्याला खास करण जोहर टच मिळेल, असा सिनेमा अद्याप केला गेला नाही, असे करण जोहरने म्हटले आहे. “स्टुडंट ऑफ द इयर’ नंतर आपल्या कोणत्याही सिनेमामध्ये आलियाच्या टॅलेंटचा उपयोग करून घेता आला नाही. त्यातल्या त्यात इम्तियाझ अलीच्या “हाय वे’मध्ये आलियाच्या ऍक्टिंगला चांगला वाव होता. “तख्त’मध्येही आलियाच्या वाट्याला फार मोठा रोल असणार नाही.
कारण या सिनेमात विकी कौशल, रणवीर सिंह, करीना कपूर, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूर सारखी अनेक कलाकार मंडळींची गर्दी असणार आहे. मात्र त्यातही आपल्या दायरेक्शनखाली आलियाचा चांगला परफॉर्मन्स प्रेक्षकांसमोर आणण्याचा विश्वास करण जोहरला वाटतो आहे.