इंदापूर, (प्रतिनिधी) –इंदापूर येथील दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांच्या हस्ते भाजप युवा मोर्चाच्या युवा सदस्यांना विविध पद नियुक्तीच्या पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने युवा वर्ग उपस्थित होता.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, युवा सदस्यांनी शासनाच्या सर्व योजनांचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न करावा. भारत हा जगात सर्व क्षेत्रात शक्तिशाली देश म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढे येत असून देशाने सर्व क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे तसेच सर्वांसाठी विविध योजना राबवून सर्वसामान्य व्यक्तींच्या विकासाकरिता प्रयत्न केले आहेत. पदाचा उपयोग सर्वसामान्य व्यक्तीच्या विकासाकरिता करावा. राजवर्धन पाटील म्हणाले की, भारताची युवा ही शक्ती असून युवा वर्गाच्या प्रगतीकरिता भाजप मोठ्या प्रमाणात योजना राबवित असून, युवांच्या कल्याणाकरिता युवा मोर्चाच्या सदस्यांनी प्रयत्नपूर्वक कार्य करावे.