मुंबई – दिशा सालियान प्रकरणी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर सत्ताधारी पक्षाकडून निशाणा साधला जात आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरे आता कायदेशीर पाउले उचलणार असून न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. आदित्य ठाकरे सध्या कायदेशीर सल्ला घेत असून लवकरच न्यायालयात जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान प्रकरणी टीकेचा सामना करावा लागत आहे. भाजप नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांना या प्रकरणावरुन वारंवार टार्गेट केले जात आहे. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांना भाजप नेत्यांकडून जबाबदार धरले जात आहे.
आदित्य ठाकरे यांनी याआधी यावर कोणताही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता ते आरोप करणाऱ्यांविरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. ते आता याप्रकरणी न्यायालयात धाव घेणार असून दिशा बदनामी करणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, सालियान मृत्यूप्रकरणावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सतत आरोप केले जात आहेत. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने फोन येत होते आणि एयू म्हणजे आदित्य ठाकरे असा असल्याचा आरोप केला होता.