Madhukar Chavan । देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच उमेदवार जोरात प्रचाराला लागले आहेत. त्यासाठी ते प्रचारसभा घेताना दिसत आहेत. त्यातच प्रत्येक पक्षाचे मोठे नेते देखील या सभांना हजेरी लावून आपल्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करत आहे. अनेक ठिकाणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मतदारांना आपल्याकडे खेचण्याकरता जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे यंदा सत्तांतर होतंय की केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान, हे सर्व सुरु असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय.
जगामध्ये मोदींना ठार मारण्याचे कट Madhukar Chavan ।
गुहागरमध्ये बोलताना मधुकर चव्हाण यांनी,“पुन्हा घडाळ्याचे काटे उलटे फिरायला निघाले आहेत. मोदींना ठार मारण्याचे कट जगामध्ये शिजत आहेत. मी जबाबदारीने बोलत आहेत. हा नेता पुन्हा भारताचा पंतप्रधान झाला तर जगात देश बलशाली होईल”, असे धक्कादायक वक्तव्य चव्हाण यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात गोंधळ उडालाय.
पवारांसारखा राजकीय धुडगूस राज्यात कोणी घातला नाही Madhukar Chavan ।
“ज्या आंबेडकरांनी घटना निर्माण केली, सूर्यासारख्या तेजस्वी आंबेडकरांच्या पोटी प्रकाश आंबेडकरांच्या निमित्ताने काजवा जन्माला आलाय. तुम्ही भाजपाला शिव्या द्या, तुम्ही शिवसेनेला शिव्या द्या, तुम्ही आमच्या धोरणांवर टीका करा. शरद पवारांसारखा राजकीय धुडगूस महाराष्ट्रात कोणी घातला नाही, तुम्ही त्यांच्या बाजूला जाऊन बसलात. कुठे आलाय महाराष्ट्र? जरांगे पाटलासारख्या भंपक माणसाला उभं केलं, छगन भुजबळ मंत्री असतानाही त्यांना शिव्या दिल्या गेल्या”, असं मधुकर चव्हाण म्हणाले.