मुंबई – धर्मा प्रॉडक्शनच्या “योद्धा’मधील हिरोईनची नावे करण जोहरने काल जाहीर केली. दिशा पटणी आणि राशी खन्ना या नवीन ऍक्शनपॅक्ड सिनेमात लीड रोल साकारणार आहेत. इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये करण जोहरने या दोघींचे भरपूर कौतुक केले आहे.
“योद्धा’ची हिरो असलेल्या सिद्धार्थ मल्होत्रानेही या टीममध्ये या दोघींचे स्वागत केले आहे. तिच्या या छबीला “योद्धा’ साजेसा नाही. पण राशीला चांगला ब्रेक मिळवून देण्यासाठी तो निश्चितच फायद्याचा ठरेल. राशीने आतापर्यंत दाक्षिणात्य सिनेमांमधूनच काम केले आहे. त्यातही तेलगू सिनेमात ती अधिक चमकली आहे.
View this post on Instagram
विजय देवरकोंडाबरोबरच्या “वर्ल्ड फेमस लव्हर’ मधूनही ती चमकली आहे. करण जोहरच्या सिनेमात आपल्याला संधी मिळाली हा आपला बहुमान आहे, असे तिने म्हटले आहे. सागर आम्ब्रे आणि जुष्कर ओझा यांचे डायरेक्शन असलेला
“योद्धा’ पुढच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा “शेरशहा’ प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता त्याच्या “योद्धा’कडूनही प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा असणार हे नक्की.