मुंबई – अभिनेत्री ‘दिशा पटानी’ (Disha Patani) ही बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड (Disha Patani hot) अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत असते. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटामधून अभिनेत्री दिशा पटानी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.
दिशाचा (Disha Patani) फॅशन सेन्स इतका कमाल आहे की कोणत्या वेळी काय परिधान करावे, आणि लक्ष कसे वेधून घ्यावे हे तिला बरोबर माहीत आहे. आणि म्हणूनच दिशा बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ फॅन्स सोबत शेअर करते. आणि फॅन्स देखील तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रेम देतात. नुकतंच अभिनेत्री ‘दिशा पटानी’ने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा काही फोटो पोस्ट केला असून, तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
या फोटोमध्ये अभिनेत्रीने व्हाईट कोर्सेट शॉर्टड्रेस घातला आहे. यासोबत रेड लिपस्टिक आणि पेन्सिल हिल्स कॅरी केले आहेत. या लूकमध्ये दिशा कमालीची मादक आणि हॉट दिसत आहे.
दरम्यान, दिशाचे (Disha Patani) हे फोटो दुसऱ्याच अकाऊंटवरून शेअर केले गेले असले तरी नेटीझन्स तिला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही या फोटोंच्या खाली अनेकांनी कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. पण यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे ते नापसंतीच्या कमेंट्सचं.