मुंबई – संगीतविश्वातले अनेक गायक लाइव कॉन्सर्ट करत असतात. नावाजलेली आणि लोकप्रिय असे गायक जेव्हा लाइव कॉन्सर्ट करतात तेव्हा त्यांच्या शो ला हाऊस फुल्ल गर्दी असते. या लाइव कॉन्सर्टला अनेक रसिक महागडे तिकीट काढून जात असतात.
असाच एक लाइव कॉन्सर्ट नुकताच भारतात पार पडला, मात्र या शो ची चर्चा प्रेक्षकांच्या गर्दी मुळे किंवा त्यातील गाजलेल्या गाण्यांमुळे होत नसून तेथे घडलेल्या किळसवाण्या प्रकारामुळे होत आहे.
न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध पॉप बँड ब्रास अगेन्स्ट यांचा भारतात लाइव कॉन्सर्टमध्ये या बँडची गायिका सोफिया उरिस्ता हिने एका चाहत्याला स्टेजवर बोलवलं. त्याला स्टेजवरच खाली झोपायला सांगितलं आणि त्याच्या चेहऱ्यावर लघवी केली. यावेळी एकच खळबळ उडाली.
या किळसवाण्या प्रकाराच चित्रीकरण व्हायरल सध्या सोशलवर झालं आहे. सोफियावर युजर्स द्वारे टीकेची झोड उठली आहे. यानंतर तिने आपल्या सोशल अकाउंट वरून यावर माफी मागितली आहे. मी जो स्टंट केला तो योग्य नव्हता. लोकांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,