मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी गौरी म्हणजेच, अभिनेत्री ‘सायली संजीव’ आज महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. सायली संजीवने या मालिकेत झळकण्याआधी काही चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच, ‘काहे दिया परदेस’ ही मालिका संपल्यानंतर तिने गुलमोहर या मालिकेत काम केले होते.
View this post on Instagram
सध्या सायली आपल्या आगामी ‘झिम्मा’ या चित्रपटाच्या टिझर मुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ८ मार्च म्हणजेच, ‘जागतिक महिला दिना’निमित्त या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, चित्रपटाचा टिझर आउट झाल्यानंतर सोशावर एकच चर्चा रंगू लागली ती म्हणजे सायली संजीव हिच्या बोल्ड सीनची. मराठी मालिकांमध्ये सूनेच्या भूमिकेत दिसणाऱ्या सायलीने चित्रपटांमध्ये मात्र थोडी हटके भूमिका साकरण्यावर भर दिला आहे.
View this post on Instagram
चित्रपटाच्या ट्रेलरमधील तिच्या बोल्ड अवताराने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये अंघोळ करतानाचा एक सीन दाखवण्यात आला आहे. यात सायली बोल्ड अंदाजात दिसत आहे. त्यानंतर सायलीच्या बोल्ड सीनची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. यापूर्वी सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांच्या बोल्ड सीनने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.
View this post on Instagram