विकी कौशल आणि कॅटरीना कैफ यांच्या नात्याविषयी बरीच गरमागरम चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. विकी यापूर्वी डान्सर आणि मॉडेल हरलीन सेठीला डेट करत होता. पण काही महिन्यांपूर्वीच त्याचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअनंतर हरलीनने अनेक पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या होत्या आणि आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यानंतर त्याच्या आणि कॅटच्या अफेअरची चर्चा सुरु झाली.
या दोघांनीही याविषयी काहीच प्रतिक्रिया न दिल्यामुळे आणि या चर्चांचे-अफवांचे खंडनही न केल्यामुळे दोघांत काहीतरी नक्कीच शिजत असल्याची शंका अधिक जोमाने घेतली जाऊ लागली. पण आता विकी कौशलने याबाबत मौन सोडले आहे. तो म्हणतो, याबाबत खुलासा करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय करतो याविषयी मी फारसे कधी बोलत नाही. पण मी खोटं सांगणार नाही. कारण मी एक खोटे बोललो तर ते लपवण्यासाठी आणखी खोटे बोलावे लागेल.
View this post on Instagram
माझे एखादे विधान आगीसारखे पसरत जाईल. पुढच्या वेळी पत्रकार मला भेटतील तेव्हा माझे विधान बदललेले असेल आणि मग ते अधिक प्रश्न विचारतील. त्यावर मी पुन्हा खुलासे करत राहीन, हे सर्व मला नको आहे’ असे विकी सांगतो. गंमत म्हणजे, हे सांगतानाच विकी म्हणाला की, जिथवर प्रेमाचा प्रश्न आहे प्रेम ही एक उत्कृष्ट भावना आहे. आता या शेवटच्या विधानाचा नेमका काय अर्थ आहे, हे विकी आणि कॅटरिना दोघांनाच ठाऊक !