सध्याघराघरांमध्ये करोना नामक महाभयंकर व्हायरसची भीती पसरली आहे. या विषाणूपासून बचावासाठी सार्वजनिक जीवनात अनेक जण मास्क लावून फिरताना दिसत आहेत. बॉलीवूड कलाकारांमध्येही या विषाणूमुळे जबरदस्त भीती पसरली आहे. त्यामुळेच अनेक सिनेकलाकार सर्तक झाले आहेत.
View this post on Instagram
Sad, but I guess this is the situation now. Stay safe guys. ? #Coronavirus #StaySafe
बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्राने अलीकडेच सोशल मीडियावर एक फोटो टाकला आहे. त्यामध्ये तिने मास्क परिधान केलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने व्हायरसपासून बचाव करण्याचे आवाहनही केले आहे. पण या फोटोमुळे परिणीती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.
याचे कारण हा फोटो शेअर करताना परिणीतीने असे लिहिले आहे की, मला खूप दुःख वाटते. पण परिस्थिती तशी आली आहे. त्यामुळे सर्वांनीच सुरक्षित राहा. पण ट्रोलर्सनी यावरुन टीका केलेली नाही.
त्यांचे म्हणणे इतक्या गंभीर विषयावर जनजागृती करण्यासाठी मास्क परिधान करुन खास फोटोशूट करण्याची गरज काय? परिणीतीच्या आधी रणबीर कपूर आणि सनी लियोनी हे दोघेही विमानतळावर मास्क घालून फिरताना दिसून आले.
सनीनेही याचा फोटोसोशल मीडियावर शेअर केला होता. पण परिणीतीने खास फोटोसेशन केलेले ट्रोलर्सना आवडलेले नाही!
View this post on Instagram
Saree, not saree! ♠️ Happy Diwali everyone. Decided to wear a saree this time. Enjoyed it ?