नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात आज 2 हजार 312 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 14 हजार 642 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 84.22 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्णसंख्येत 3 हजार 592 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 19 हजार 905 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 713, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 967 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 912 रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 176, अकोले 67, जामखेड 48, कर्जत 70, कोपरगाव 26, नगर ग्रामीण 52, नेवासा 30, पारनेर 36, पाथर्डी 58, राहता 21, राहुरी 32, संगमनेर 11, शेवगाव 07, श्रीगोंदा 29, श्रीरामपूर 07, कँटोन्मेंट बोर्ड 28, मिलिटरी हॉस्पिटल 12 आणि इतर जिल्हा 02 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 380, अकोले 25, जामखेड 03, कर्जत 08, कोपरगाव 21, नगर ग्रामीण 68, नेवासा 09, पारनेर 15, पाथर्डी 23, राहाता 81, राहुरी 13, संगमनेर 135, शेवगाव 14, श्रीगोंदा 26, श्रीरामपूर 22, कँटोन्मेंट बोर्ड 29 आणि इतर जिल्हा 94 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 1912 जण बाधित आढळुन आले. मनपा 293, अकोले 97, जामखेड 29, कर्जत 81, कोपरगाव 97, नगर ग्रामीण 227, नेवासा 167, पारनेर 73, पाथर्डी 114, राहाता 210, राहुरी 157, संगमनेर 71, शेवगाव 132, श्रीगोंदा 44, श्रीरामपूर 69, कॅन्टोन्मेंट बोर्ड 20 आणि इतर जिल्हा 31 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा 498, अकोले 170, जामखेड 48, कर्जत 132, कोपरगाव 107, नगर ग्रामीण 185, नेवासा 59, पारनेर 133, पाथर्डी 57, राहाता 278, राहुरी 142, संगमनेर 67, शेवगाव 65, श्रीगोंदा 39, श्रीरामपूर 237, कॅन्टोन्मेंट 85, मिलिटरी हॉस्पिटल 06 आणि इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.
करोना अपडेट्स
बरे झालेली रुग्ण संख्या:1,14,642
उपचार सुरू असलेले रूग्ण:19905
जिल्ह्यातील एकूण मृत्यू:1582
एकूण रूग्ण संख्या:1,36,129