पुणे – लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील ब्रिगेडियरने उद्यान एक्सप्रेस खाली आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी घडली. अनंत नाईक (ब्रिगेडियर, हेड ऑफ द डिपार्टमेंट
हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन ) असे मयताचे नाव आहे.
मयत अनंत नाईक हे भुवनेश्वर येथील रहिवासी आहेत. ते एएफएमसी येथे कार्यरत होते. आज सकाळी ते सरकारी गाडी घेऊन ड्रायव्हर बोडके सोबत पुणे रेल्वे स्टेशन येथे आले. ड्रायव्हर बोडके यांस मी एमसीओ मधून जाऊन येतो असे सांगून पुणे रेल्वे स्टेशन येथे आले. त्यांनी सकाळी १२.१५ मि. वाजता उद्यान एक्सप्रेस गाडीच्या इंजिन पुढे येऊन आत्महत्या केली.
सदरची घटना ही प्लॅटफॉर्म क्रमांक ३ येथे घडली. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सुसाईड नोट मिळून आली नाही. त्यांच्या आत्महत्येबाबतची माहिती त्यांचा मुलगा अभिषेक नाईक यास फोन द्वारे कळवण्यात आली. अभिषेक याने तो आल्यानंतरच पीएम करण्याबाबतची विनंती केल्याने पीएम उद्या करण्याचे ठरविण्यात आले आहे.
सीसीटीव्ही फुटेज मध्ये मयत इसम हे प्लॅटफॉर्म नंबर एक या ठिकाणी फिरत असताना दिसत आहेत. तसेच त्यांनी चेन्नई एक्सप्रेसखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो सक्सेस झाला नाही. असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. घटनास्थळाला व त्यांच्या कार्यालयास पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी भेट दिली आहे. स्वता: पोलिस अधीक्षक तपास करीत आहेत.