पुणे – खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात शुक्रवारी दिवसभर चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणांमध्ये येवा वाढला असून पानशेत आणि वरसगाव धरणातून पॉवर हाऊसद्वारे प्रत्येकी 600 क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. दरम्यान खडकवासला प्रकल्पात एकूण 27.16 टीएमसी म्हणजे 93.17 टक्के इतका पाणीसाठा आहे.
शुक्रवारी दिवसभरात खडकवासला-13, पानशेत-18, वरसगाव- 20 आणि टेमघर धरण क्षेत्रात 25 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. याआधी खडकवासला धरण आणि पानशेत धरण आधीच 100 टक्के भरले. त्यानंतर 10 दिवसांपूर्वी खडकवासला प्रकल्पातील सर्वांत मोठे वरसगावही 100 टक्के भरले. खडकवासला धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शहराचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
धरणाचे नाव पाणीसाठा टक्के
खडकवासला 0.90 टीएमसी 45.72
पानशेत 10.58 टीएमसी 99.41
वरसगाव 12.71 टीएमसी 99.10
टेमघर 2.97 टीएमसी 80.03
एकूण 27.16 टीएमसी 93.17