बारामती – करोनामुक्त झालेल्या बारामती तालुक्यात पुन्हा करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कटफळ (ता. बारामती) यथील 79 वर्षीय वृद्धस करोनाची लागण झाली आहे. ग्रामीण भागातील करोना संक्रमित हा दुसरा तर शहर व तालुक्यातील हा नववा रुग्ण आहे. रुग्णाच्या संपर्कातील 32 जणांना तपासणीसाठी पुणे येथे नेण्यात आले आहे. बारामती शहरातील खासगी रुग्णालयातील 12 जणांचा त्यामध्ये समावेश आहे.
कटफळ येथील संबंधित रुग्ण रविवारी (दि. 3) मुंबई येथे कर्करोगावर उपचार घेण्यासाठी गेला असता गेला असता सोमवारी (दि. 4) तो करोना संक्रमित आल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले असून त्याच्यावर मुंबई येथे शहरात उपचार सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. कटफळमध्ये बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता त्या क्षेत्रात सर्व प्रकारची वाहतूक नियंत्रित करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील माळेगाव येथे दि. 24 एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला होता तर दि. 25 एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर कटफळ येथे पूर्ण संक्रमित दुसरा रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कटफळ येथील रुग्णास करोनाची बाधा झाल्याने ग्रामीण भागात इतर लोकांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नये अशी सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
कंपन्यांनी काळजी घ्यावी
कटफळ भागात बारामती एमआयडीसीचा काही भाग येतो हा भाग कंन्टेमेंटमधून वगळण्यात आला आहे. तरी एमआयडीसीत कटफळ येथील कामगार मोठ्या संख्येने आहेत. या कामगारांना कंपनीत कामावर घेताना योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.