मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच राम गोपाल वर्मा त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आले होते. त्यांनी द्रौपदी मुर्मू, पांडव आणि कौरवांबद्दल एक ट्विट केले होते. त्या ट्विटनंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना खूप ट्रोल करण्यात आले, त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आता पुन्हा एकदा त्यांनी स्वतःबद्दल असा खुलासा केला आहे, जो ऐकून सगळेच थक्क व्हाल.
राम गोपाल वर्मा त्यांच्या आश्चर्यकारक विधानांमुळे चर्चेत राहतात. राम गोपाल वर्मा यांनी एका इंग्रजी वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. राम गोपाल वर्मा यांनी सांगितले की, लहान असताना. त्यांनी ‘एंटर द ड्रॅगन’ हा चित्रपट पाहिला. तेव्हापासून तो ब्रूसलीचा फॅन बनला होता. मुलाखतीदरम्यान राम गोपाल वर्मा म्हणाले, ‘मी गे नाही, पण ब्रूस ली हा एकमेव माणूस आहे ज्याला मी किस करू इच्छित होतो. त्यांनी सांगितले की ब्रूस लीच्या ऍटिट्यूडमुळे त्यांना त्याचे चुंबन घ्यायचे होते. राम गोपाल वर्माच्या या वक्तव्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आजकाल राम गोपाल वर्मा त्याच्या आगामी ‘लडकी: एंटर द गर्ल ड्रॅगन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. सध्या राम गोपाल वर्मा मार्शल आर्टवर आधारित चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात पूजा भालेकर मुख्य भूमिकेत आहे. अभिनेत्रीचा बोल्ड आणि फुल ऑन अॅक्शन अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.