मुंबई – बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नव नवीन प्रयोग करणारा दिग्दर्शक म्हणून राम गोपाल वर्माची ओळख आहे. बॉलिवूडसह तामिळ,तेलगूमध्ये देखील राम गोपाल वर्मा खूप प्रसिद्ध आहे. सरकार, वीरप्पन,फुंक असे अनेक दर्जेदार चित्रपट देणारा राम गोपाल वर्मा सतत चेचेत देखील असतो. आता देखील राम गोपाल वर्मा एका हटके व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये राम गोपाल वर्मा एका अभिनेत्रींसोबत अनेक वेळ गप्पा मारताना दिसत आहे. तेलगू सिनेसृष्टीतील या अभिनेत्रींसोबत राम गोपाल वर्माने जवळजवळ तासभर गप्पा मारल्या आहेत. यावेळी त्याने थेट अभिनेत्रीच्या पायांना किस केल्याचे दिसून येते. येव्हढयावरच तो थांबला नाही तर त्याने आणखी जोर जोरात पायाला किस करायला सुरुवात केली. राम गोपाल वर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे.
Here is my Full video with the DANGEROUS ASHU REDDY…Watch at your own RISK https://t.co/MsOGO6uo54
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) December 6, 2022
तेलगू इंडस्ट्रीतील ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आशु रेड्डी आहे. राम गोपाल वर्मा यांच्या चाहत्यांनी त्याच्या या नवीन प्रयोगाबाबत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुमारे तासभर या अभिनेत्रीने राम गोपाल वर्मा यांची मुलाखत घेत त्यांना विविध विषयांवर बोलत केल्याचे समजते.