सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येबाबत विविध तर्क वर्तविले जात आहेत. सुशांतच्या मृत्यूस बॉलीवूड कॅम्प, नेपोटिज्म कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर सुशांतचे चाहते त्याला न्याय मिळावा, अशी मागणी करत अनेक सेलिब्रिटींना ट्रोल करत आहे.
करण जोहर, आलिया भट्ट, सलमान खान यांच्यानंतर आता दिग्दर्शक महेश भट्टवरही टीका होत आहे. सध्या सोशल मीडियावर सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि महेश भट्टचे जुने फोटो व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये महेश भट्ट यांनी रियाच्या खांद्यावर डोके ठेवले आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये रियानेही महेश भट्टला मिठी मारली आहे. हे फोटो खूपच व्हायरल होत असून अनेक जणांनी महेश भट्टवर निशाणा साधला अहे. महेशसह काही चाहत्यांनी रियालाही ट्रोल केले आहे.
दरम्यान, तसेच अनेकांनी आरोप केला आहे की, महेश भट्टनेही करण जोहरप्रमाण्े नेपोटिज्मला प्रोत्साहन दिले आहे. अनेक युजर्सनी सुशांतची तुलना थेट परवीन बाबीशी करत महेश भट्टवर भाष्य करत आहे. सध्या सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलीवूडमध्ये एकच खळबळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.