स्कायडायव्हिंगची सम्राज्ञी शीतल महाजन यांच्यासोबत दिलखुलास गप्पा

पुणे: भारतीय महिला म्हणजे चूल व मूल या चक्रात न राहता त्यांनी विविध क्षेत्रात जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविला पाहिजे, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवीतच माझ्यासारख्या अनेक शीतल घडविण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी नवोदितांना विनामोबदला प्रशिक्षण देण्यासही मी तयार असते असे पद्मश्री सन्मान विजेती स्कायडायव्हर शीतल महाजन हिने प्रभात डीजिटल माध्यमास मुलाखत देताना सांगितले.

शीतलने स्कायडायव्हिंग क्षेत्रात अनेक विश्‍वविक्रम नोंदविले आहेत. तिने उत्तर व दक्षिण ध्रुव, अंटार्टिकावर उडी घेण्याचा विक्रम केला आहे. गेली पंधरा वर्षे या क्षेत्रात तिने पाचही खंडांमध्ये स्काय डायव्हिंग करणारी पहिली महिला होण्याचा मानही मिळविला आहे. तिचे पती वैभव राणे हेदेखील अव्वल दर्जाचे स्काय डायव्हिंग करतात. अलीकडेच शीतलने वृषभ व वैष्णव तसेच पती वैभव यांच्यासमवेत स्कायडायव्हिंग करीत मुलखावेगळी कामगिरी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.