शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे काम दिशादर्शक

आमदार बाबुराव पाचर्णे यांचे गौरवोद्‌गार

टाकळी हाजी-सभासदांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेने सभासद कर्जात भरघोस वाढ केली असून नुकत्याच पतसंस्थेत झालेल्या कार्यक्रमात प्रथम धनादेशाचे वितरण शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, पंचायत समिती शिरूरचे सभापती विश्वास कोहोकडे, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र भुजबळ यांच्या शुभहस्ते आणि संस्थेचे सभापती प्रदीप गव्हाणे, उपसभापती संध्या धुमाळ, मानदसचिव संतोष शेळके, खजिनदार निलेश गायकवाड आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आले.

यापूर्वी संस्थेची कमाल कर्जमर्यादा कमाल 12 लाख होती. संस्थेच्या कमाल 25 लाख कर्जमर्यादेस सहकार खात्याने मान्यता दिली असून मान्यवरांच्या उपस्थितीत कर्जवितरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार पाचर्णे यांनी संस्थेच्या पारदर्शक कारभाराचे कौतुक करताना संस्थेचे मोबाईल ऍप, संजीवनी ठेव, संस्थेची स्वयंपूर्णता याबद्दल गौरवोद्‌गार काढले. सभापती कोहोकडे यांनीही संस्थेची आर्थिक स्थिती आणि तत्पर सेवेबद्दल संचालक मंडळाचे कौतुक केले.

संस्थेची स्थापना 1931 साली झाली असून 1511 सभासद असणाऱ्या या संस्थेची वार्षिक उलाढाल 122 कोटी आहे. संस्थेस सुमारे 3 कोटी नफा झाला असून 9 % दराने लाभांश वाटप केला आहे. संस्थेचा सर्व कारभार संगणकीकृत असून 72 कोटी रु. कर्जवाटप केले आहे. संस्थेस गुणवत्तेचे आयएसओ 9001-2015 मानांकन प्राप्त असून संस्थेस पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून प्रथम क्रमांकाचा रु. एक लाखाचा शरद पवार सहकार गौरव पुरस्कार मिळाला आहे.

यावेळी पदवीधर संघटनेचे राज्यसरचिटणीस. अनिल पलांडे, जिल्हा कार्याध्यक्ष शहाजी पवार, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब दुर्गे, अखिल शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव वाळके, एकल मंचचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब खेसे, शिवदुर्गप्रेमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पवार, केंद्रप्रमुख संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र टिळेकर, विजयराव बेंडभर, सुखदेव नरके, काळूराम पिंगळे, अशोक राऊत, शंकर शिंदे, सुरेश खैरे, रामदास विश्वास, पदवीधर कार्याध्यक्ष नरहरी नरवडे, सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक सभापती प्रदीप गव्हाणे, सूत्रसंचालन संतोष विधाटे यांनी तर वंदना पाचर्णे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.