अर्थव्यवस्थेला लवकरच चौथा बुस्टर डोस

नवी दिल्ली : मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थमंत्रालय उपाय योजनांचा आणखी एक बुस्टर डोस देण्याच्या तयारीत आहे. त्याची ब्लू प्रिंट तयार असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लवकरच त्याची घोषणा करतील, अशी माहिती अर्थमंत्रालयाच्या सुत्रांनी दिली.

बॅंकांचे विलीनीकरण, सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांना चालना, वाहन आणि बांधकाम व्यावसायिकांना मदतीचा हात आणि निर्यातीला प्रोत्साहन अशा योजना पहिल्या तीन टप्प्यात जाहीर करण्यात आल्या. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी सोमवारी त्याचे सुतोवाच केले होते. येत्या आठवड्यात जीएसटी परिषदेची 37वी बैठक अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्यात वाहन, नाशवंत माल यांसह अन्य क्षेत्रातील जीटसटी दराचा फेर आढावा घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.