नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर होत असलेल्या छापेमारीवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली आहे. “एक ही थाली के चट्टे-बट्टे” असे म्हणत सिंह यांनी आरएसएसची तुलना पीएएफआयशी केली आहे. द्वेष आणि हिंसाचार पसरवणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा हल्लाबोल केला आहे.
आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेवर कारवाई का करण्यात येत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. २२ सप्टेंबरला एनआयए आणि सक्तवसुली संचालनालयाने) ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील ठिकाणांवर छापेमारी केली. याप्रकरणी तपास यंत्रणांनी पीएफआयच्या जवळपास १०० सदस्यांना अटक केली आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक साहाय्य केल्याचा या संघटनेवर आरोप आहे.
#WATCH | Gwalior, MP: Action should be taken against all those who spread hatred and violence. Why action is not being taken against RSS & Vishva Hindu Parishad? They (PFI-RSS) are ‘Ek hi thaali ke chatte-batte’: Congress MP Digvijaya Singh on action against PFI pic.twitter.com/omaxsIB1eY
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) September 24, 2022
मुस्लीम तरुणांना ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी फूस लावून भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा कट होता, असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने शनिवारी केला आहे. ‘पीएफआय’चे नेते आणि कार्यकर्ते अनेक बेकायदा कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका ‘एनआयए’ने ठेवला आहे.