मुंबई – बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. रॉकेट्री आणि ब्रह्मास्त्र यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने छोट्या भूमिका केल्या असल्या तरी गेल्या काही वर्षांत त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. अशा परिस्थितीत पुढील वर्षी त्याचे जवान, पठाण आणि डंकी हे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.तत्पूर्वी जवानच्या ओटीटी राइटस शाहरुखने विकले असलयाचे वृत्त समोर झाले आहे.
शाहरुख खानने जवानचे ओटीटी आणि सॅटेलाइट अधिकार विकले आहेत आणि रिलीजपूर्वीच चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. शाहरुख खानच्या जवान या बिग बजेट चित्रपटाचे राईट्स झी टीव्ही आणि नेटफ्लिक्सने 250 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. होय हे खरं आहे शाहरुखच्या जवान चित्रपटाने रिलीज आधीच २५० कोटी रुपये कमावले आहेत.
#LetsCinema EXCLUSIVE: Shah Rukh Khan’s big budget action entertainer #Jawan directed by Atlee, all India Satellite rights bagged by Zee TV and Digital rights bagged by Netflix for a total amount of ₹250 crores. pic.twitter.com/5Qmz9v9YBf
— LetsCinema (@letscinema) September 24, 2022
शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली जवान हा चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय सुनील ग्रोव्हर आणि विजय सेतुपती हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये 2 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.