मुंबई – बॉलिवूडचा ऍक्शन हिरो म्हणजेच अभिनेता जॉन अब्राहम आपल्या आरोग्याच्याबाबतीत नेहमीच काळजी घेताना दिसून येतो. बॉलिवूडच्या सर्वाधिक फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. अनेकदा तो आपल्या फिटनेसबाबत सांगत असतो. मात्र फिटनेससाठी स्ट्रीक डाएट फॉलो करणाऱ्याला जॉन अब्राहमला खाण्या पिण्याची प्रचंड आवड होती. एका हॉटेलमध्ये त्याने एकाचवेळी चक्क ६४ चपात्या खाल्ल्याचे एका कार्यक्रमतात सांगितले आहे. सध्या त्याने सांगितलेला हा किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे.
जॉनने ‘द कपिल शर्मा ’ शोमध्ये काही महिन्यांपूर्वी हजेरी लावली होती. त्याच्या ‘अटॅक’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो अभिनेत्री रकुल प्रीत सिंहसह या शोमध्ये उपस्थित राहिला होता. यावेळी कपिलने तू एकदा रेस्टॉरंटमध्ये ६४ चपात्या खाल्ल्या होत्या ही अफवा खरी आहे का? असा सवाल केला होता. त्यावर जॉनने ही खरे असल्याचे सांगितले आहे.
जॉन म्हणाला की, हो, हे खरे घडले आहे. मी एकाचवेळी 64 चपात्या खाल्ल्या होत्या आणि हे पाहून वेटर हैराण झाला होता. त्यानंतर वेटर मला अजून भात सुद्धा आहे, असं मला म्हणाला होता. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा जॉन अब्राहम हा आहार, व्यायाम आणि झोपेबाबत खूपच सजग आहे. यासाठी त्याने वेळापत्रक निश्चित केलेले आहे. या तिन्ही गोष्टी मनुष्यासाठी खूप आवश्यक असल्याचे तो म्हणतो. दिवसातील काही तास तो व्यायामशाळेत घालवतो.
व्यायामाचा अर्थ केवळ बॉडी तयार करणे नाही तर शरीराला आराम देण्याचा देखील एक मार्ग आहे, असे तो म्हणतो. तो खाण्याचा खूपच शौकीन आहे; परंतु तो निवडक गोष्टीचेच सेवन करतो. कधी कधी सुट्टीच्या दिवशी शिजवलेले बटाटे आणि भरपूर पनीर खातो. तो तेलकट पदार्थही कमीच खातो. विशेष म्हणजे तो शाकाहारी आहे.
दरम्यान, नुकताच जॉन ‘पठाण’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणही दिसले होते. या चित्रपटात तो ग्रे शेडच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडला होता.