मुंबई – सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या ऍक्टिंग आणि आपल्या हटके राहणीमानातून प्रेक्षकांच्या मनात अनेक वर्षापासून राज्य केले आहे. त्यांच्या हटके अंदाजाला प्रेक्षक नेहमीच दाद देत असतात. याचेच एक उदाहरण मुंबईतील कार्यक्रमावेळी बघावयास मिळाला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुपरस्टार रजनीकांत मुंबईतील एक कॉलेजमध्ये खासगी कार्यक्रमात उपस्थितीत होते. यावेळी तेथे उपस्थितीत लोकांनी त्यांचे धमाकेदार स्वागत केले असून त्यांच्या एंट्रीवर लुंगी डान्स गाणे वाजविले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
रजनीकांत ‘पेटा’ चित्रपटानंतर लवकरच दरबार या चित्रपटातून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे. या चित्रपटतील रजनीकांत यांचा फर्स्ट लुक रिलीज झाला. या चित्रपटात रजनीकांत शिस्तबद्ध पुलिस अधिकाऱ्याची भूमिका निभवणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सुपरस्टार रजनीकांत आपल्या अनोख्या अंदाजामध्ये दिसून येत आहे. त्याचबरोबर पोस्टरमध्ये पोलीस विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक वस्तू दाखविण्यात आल्या आहे. तसेच गेटवे ऑफ इंडिया सुद्धा दाखविण्यात आला आहे.