बर्मिंगहॅम – स्टुअर्ट ब्रॉड व ख्रिस व्होक्स या इंग्लंडच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. त्यामुळेच त्यांच्याविरूद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात घसरगुंडी उडाली. त्यांची 44 षटकांत 8 बाद 122 अशी दयनीय स्थिती झाली होती. ही पडझड होत असताना स्मिथने संयमपूर्ण खेळ केला. पीटर सिडल आणि स्टीव स्मिथ यांनी डाव सावरत संघाची धावसंख्या 284 पर्यंत नेली. स्मिथ 144 तर पीटर सिडल 44 धावांवर बाद झाला.
An incredible knock of 144 from Steve Smith helped Australia to 284 on day one of their opening Test against England. #Ashes REPORT ⬇️ https://t.co/rZMMEhAoJm
— ICC (@ICC) August 1, 2019
एजबॅस्टन मैदानावर या दोन संघांमधील ऍशेस मालिकेस गुरूवारी प्रारंभ झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या अंगलटी आला. डेव्हिड वॉर्नर व कर्णधार टीम पेनसह त्यांच्या भरवशाच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली.
ब्रॉडने कॅमेरून बॅन्क्रॉफ्ट (8), वॉर्नर (2),स्टीव स्मिथ (144), टीम पेन(5), जेम्स पॅट्टिसन (0) यांना बाद केले तर व्होक्सने उस्मान ख्वाजा (13), ट्रेव्हिस हेड (35), मॅथ्यु वेड (1) यांच्या विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावानंतर इंग्लंडने फलंदाजीस सुरूवार केली होती. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लडच्या बिनबाद 10 धावा झाल्या असून इंग्लंड अजूनही 274 धावांनी पिछाडीवर आहे.